युनायटेड केअर हॉस्पिटल, एन-३ सिडको · +91 76889 29292 Englishमराठीहिंदी
श्री वी केअर क्लिनिकरक्तविकार व कर्करोग उपचार केंद्र अपॉइंटमेंट घ्या
मुख्यपृष्ठ › रुग्ण व नातेवाईकांसाठी मार्गदर्शन

रुग्ण व नातेवाईकांसाठी मार्गदर्शन

पहिल्या भेटीपूर्वी

  • सर्व रिपोर्ट एका फाईलमध्ये तारखेनुसार लावा: रक्त तपासण्या, स्कॅन (सीडीसह), बायोप्सी व IHC रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड
  • बायोप्सी इतरत्र झाली असल्यास त्या लॅबकडून स्लाइड्स व ब्लॉक्स मागून घ्या – पुन्हा तपासणीसाठी लागू शकतात
  • आपण घेत असलेल्या सर्व औषधांची यादी आणा (आयुर्वेदिक/होमिओपॅथिक औषधांसह)
  • आधार कार्ड व योजना/विमा कार्ड आणा
  • प्रश्न लिहून आणा; सोबत घरातील एक व्यक्ती आणा

डॉक्टरांना विचारावे असे प्रश्न

  1. मला कोणता आजार आहे व तो कोणत्या टप्प्यावर आहे?
  2. उपचाराचे उद्दिष्ट काय – पूर्ण बरे करणे की नियंत्रण?
  3. उपचाराचे कोणते पर्याय आहेत व किती काळ लागेल?
  4. कोणते दुष्परिणाम होऊ शकतात व तेव्हा काय करावे?
  5. खर्च किती येईल; कोणत्या योजना किंवा मदत उपलब्ध आहे?

केमोथेरपीदरम्यान ही लक्षणे दिसल्यास लगेच दवाखान्यात जा

  • १००.४°F (३८°C) किंवा जास्त ताप, थंडी वाजून येणे
  • न थांबणारा रक्तस्राव, काळी शौच, उलटी/लघवीत रक्त
  • धाप लागणे, छातीत दुखणे, गोंधळल्यासारखे वाटणे
  • उलटी किंवा जुलाबामुळे दिवसभर काहीच खाता-पिता न येणे
  • अतिशय अशक्तपणा, चक्कर येऊन पडणे, लघवी फार कमी होणे

क्लिनिकला फोन करा किंवा मेडिकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर च्या आपत्कालीन विभागात जा.

उपचारादरम्यान घरी घ्यावयाची काळजी

  • वारंवार हात धुवा; पेशी कमी असताना गर्दी व ताप-खोकला असलेल्यांपासून दूर राहा
  • डॉक्टरांनी अन्यथा सांगितले नसल्यास दिवसाला २–३ लिटर पाणी/द्रव घ्या
  • ताजे व व्यवस्थित शिजवलेले अन्न खा; पेशी कमी असताना कच्चे सॅलड, रस्त्यावरील पदार्थ टाळा
  • तोंड आल्यास मऊ ब्रश वापरा व मीठ-सोड्याच्या पाण्याने गुळण्या करा
  • डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही औषध बंद करू नका किंवा नवीन सुरू करू नका

आहार

  • थोडे-थोडे, वारंवार खा; डाळ, अंडी, पनीर, दूध, दही, सोयाबीन, कडधान्ये यांतून प्रथिने मिळवा
  • भूक कमी असल्यास शिरा, तुपासह खिचडी, केळी, शेंगदाणा चिक्की उपयोगी ठरतात
  • कर्करोगाला "उपाशी" ठेवणारा कोणताही विशेष आहार नाही – चांगले पोषण उपचार सहन करण्यास मदत करते

नातेवाईकांसाठी

रुग्णाची काळजी घेणे थकवणारे असते. जबाबदाऱ्या वाटून घ्या, प्रश्न विचारा व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. अडचण असल्यास आमच्याशी बोला.